रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): स्थानिक राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (मुलींची) प्रवेश प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ पासून पुनश्च सुरू करण्यात आली आहे.
या इच्छुक महिला उमेदवारांनी २४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
