रत्नागिरी : हुजूर साहेब नांदेड आणि सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07659/07660 या 4 अतिरिक्त गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांना येडशी आणि बार्शी टाऊन स्थानकांदरम्यान धाराशिव स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला जाणार आहे. या विशेष रेल्वे गाड्यांचे इतर सर्व तपशील यथावत राहतील.
प्रवाशांनी कृपया या बदलांची नोंद घ्यावी आणि यंदाच्या गणेशोत्सवात या अतिरिक्त थांब्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा RailOne अथवा NTES ॲप डाउनलोड करा.
