‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत कोकण रेल्वेचे स्वच्छता अभियान

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  स्वच्छता हि सेवा अभियाना अंतर्गत कोकण रेल्वेने पंधरा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यातील एका उपक्रमात कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वेचा मार्ग, स्थानके आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यात कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.

कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्वच स्थानकात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.स्थानकांना जोडणारा मुख्य रस्ता,प्लॅटफॉर्म, रेल्वेमार्ग सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली.केंद्र सरकारच्या “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत कोकण रेल्वे पंधरा दिवस विविध उपक्रम राबवत आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment