कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेसला अतिरिक्त डबा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होत असलेली वाढती गर्दी लक्षात घेऊन  गुजरातमधील पोरबंदर ते दक्षिणेतील कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला ज्यादा डबा जोडला जाणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या मार्गावर धावताना दिनांक 9 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी तर  कोचुवेली ते पोरबंदर या मार्गावर धावणाऱ्या गाडीला (20909) दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment