ब्लॅक अँड व्हाईट राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : ब्लॅक अँड व्हाईट वृत्त समूहाचे संपादक विजय यादव यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा  वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली येथे उत्साहात संपन्न झाला.

शिक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन साई शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या शिक्षिका तथा उरण नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांना यावर्षीचा शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोकण पत्रकार संघाचे अध्यक्ष  संजय हांडोरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रमिला पवार यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कला सांस्कृतिक पर्यटन महोत्सव समिती अमित दुखंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष मेस्टा कल्याण अंबरनाथ ह.भ. प निलेश म्हात्रे , मुख्याध्यापिका सौ दिपाली काळे व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपादक विजय यादव म्हणाले की, “कोरोना नंतरच्या काळात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाला समाजाने विसरू नये. प्रमिला ताईंसारखे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर  प्रमिला पवार यांनी आपल्या मनोगतात, “हा पुरस्कार माझा नसून माझ्या शाळेतील सर्व सहकारी, विद्यार्थी आणि उरणकर नागरिकांचा आहे. शिक्षणासोबत सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळाली” असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते सतीश नायकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्लॅक ॲन्ड व्हाईट या साप्ताहिकाचे उप संपादक विजय यादव यांनी मानले.

या सोहळ्याला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरातील मोठ्या प्रमाणात शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment