भारतीय रेल्वे घेऊन येत आहे एक अनोखी संधी!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • नॅशनल डीजिटल घड्याळ डिझाइन’ स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका तब्बल ५ लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या अनोख्या स्पर्धेमुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला आता राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळू शकणार आहे. होय हे खरे आहे.

या स्पर्धेसाठी तुमच्या डिझाइनमध्ये असावी वेळेची अचूकता आणि आधुनिकतेचा स्पर्श. तुमचे डिझाईन निवडले गेल्यास भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर तुमची कला दिसू शकणार आहे.
यासाठी सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे ३१ मे अशी आहे.
तुमच्या एंट्रीज contest.pr@rb.railnet.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन भारतीय रेल्वे कडून करण्यात आले आहे.


महत्त्वाचे मुद्दे

  • भारतीय रेल्वेची ‘नॅशनल डिजिटल घड्याळ डिझाइन’ स्पर्धा.
  • बक्षीस: ५ लाख रुपये.
  • अंतिम तारीख: ३१ मे.
  • एंट्रीज पाठवण्याचा ईमेल आयडी: contest.pr@rb.railnet.gov.in
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment