कोकण रेल्वेकडून स्वच्छता अभियानाचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

कणकवली :  देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वे कडून विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. कोकण रेल्वेच्या विविध स्थानके,कार्यालयांमध्ये या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

विविध शाळा, महाविद्यालये, सामजिक संस्था यांचा या उपक्रमात सहभाग घेतला जात आहे.स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून देताना लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रभात फेऱ्यांचे आयोजन केले जात आहे.नुकत्याच कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम आणि जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते.

या अंतर्गत कणकवली स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.यात अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या अंतर्गत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment