- यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या पुढाकारातून घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमाचे आयोजन
घाटकोपर (शांताराम गुडेकर ) : दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर पश्चिम विधानसभा यांच्या वतीने विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी पणती (दिवे) वितरण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा आणि प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप प्रज्वलित व्हावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेना नेते, सचिव तथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे उद्घाटन ईशान्य मुंबईचे विभाग क्रमांक ८ चे विभागप्रमुख श्री. सुरेशजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच शिवसेना भवन येथे ग्राहक संरक्षण कक्षाचे उपाध्यक्ष अशोकजी शेंडे व सरचिटणीस निखिल सावंत यांच्या हस्ते पणती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मानखुर्द विधानसभा संघटक संजय चव्हाण उपस्थित होते.

या प्रसंगी कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, संजय पावले, बाजीराव शेवाळे, मध्यवर्ती कार्यालय प्रमुख विजय पवार, सहकार्यालय प्रमुख राजेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाचे आयोजन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक श्री. यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आले.
यावेळी कक्ष कार्यालय चिटणीस विश्वनाथ जाधव, कक्ष प्रसारक अनंत पवार, कक्ष वार्ड संघटक संतोष चांदे (शाखा १२३), तानाजी उल्लालकर (शाखा १२६), कल्पेश बुवा (शाखा १२७), वसंत घडशी, शाखा १२९ चे प्रतिनिधी दौलत बेल्हेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि प्रत्येक घर प्रकाशमय व्हावे, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.समाजसेवेचा वसा जपत सणांचा आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
![]()
