रत्नागिरीत १५ जून रोजी डाक अदालत

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी :  अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.


पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार मा. अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे 02 जून 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधिक्षक रत्नागिरी विभाग यांनी कळविले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment