रत्नागिरी येथे २१ सप्टेंबर रोजी डाक अदालत

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. 4 : अधी क्षक डाकघर, विभागीय कार्यालयाद्वारा 21 सप्टेंबर रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय यांच्या नावे 8 सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधिक्षकांनी कळविले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment