आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या सई सावंत हिला कांस्य पदक

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी – विद्यापीठांच्या आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू सई संदेश सावंत हिला ७३ किलो खालील वजनी गटात कांस्य पदक मिळाले.


कणकवली येथील विभागीय स्पर्धेत यशस्वी झाल्यानंतर सई विद्यापीठांच्या आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी झाली होती. माटुंगा येथील खालसा कॉलेज इथे १०,११ ऑक्टोबर २०२३ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या.

सई संदेश सावंत ही गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. विनोद शिंदे आणि एस आर के तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment