छप्पर कोसळलेल्या कांदळगाव शाळेला माजी खासदार नीलेश राणे यांची भेट

Team RatnagiriLive
1 Min Read

कणकवली : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं-२ या शाळेचे छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी  सोमवारी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी केली.

यावेळी छप्पर कोसळलेल्या शाळा इमारतीची पाहणी करून  संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास माझ्या स्वखर्चातून या शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू करून लवकरच कांदळगाव शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होईल अशी व्यवस्था देखील माझे खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment