रत्नागिरीत नाचणे येथे उद्यापासून मुलांसाठी दोन दिवसीय विनामूल्य ‘समर कॅम्प’

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : ३ ते१२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्प नाचणे ग्रामपंचायत व जि.प. पू. प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांचेवतीने नाचणे येथे विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी या त्यांच्या आयोजन करण्यात आले आहे.

दि.१५ मे २०२४ ते १६ मे २०२४ या दोन दिवशी सकाळी ७.३०.ते ११.३० या वेळेत समर कॅम्प होणार आहे. योगा ,जादूचे प्रयोग, ओरीगामी, क्राफ्ट, मनोरंजक खेळ,आवाजाची दुनिया,फेस पेंटिंग, आजी आजोबांच्या गोष्टी, बोला बिनधास्त, live बालगीते ,बडबडगीतं, रेकॉर्ड डान्स , स्वसंरक्षण ( self Defence) अशाप्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांनी समर कॅम्प होणार आहे.

रत्नागिरी व मुंबईतील नामवंत कलाकार मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. रत्नागिरी शहर व परिसरातील मुलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले,उपसरपंच निलेखा नाईक,सदस्य शुभम सावंत, अनुप्रिता आठल्ये , दीपक नागवेकर यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment