भेंडखळ येथील पावसाळी रबर बॉल सामन्यांमध्ये चिरले संघाचा विजय

Team RatnagiriLive
1 Min Read
उरण दि.९ (विठ्ठल ममताबादे ) : कर्णधार करण मढवी याच्या नेतृत्त्वाखाली भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाने उरण तालुक्यातील भेंडखळ येथे आयोजित पावसाळी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.एकूण १६ संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

शेवटी चिर्ले संघ व अंबापाडा संघ फायनल स्पर्धेत पोहोचली. अंबापाडा संघाशी झुंज देत चिर्ले संघ दुसऱ्या क्रमांकांने विजयी झाले. चिर्ले संघातील प्रियांशू घरत, सार्थक घरत, चैतन्य मढवी, चैतन्य पाटील, रमाकांत घरत, आशिष ठाकूर, शुभम पाटील, ऋषिकेश पाटील, रतिश पाटील इत्यादी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून संघाला विजयी करून दिले.

या सर्व विजयी खेळाडूंचे व संघांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment