ग्रामसेवक संघटना व पंचायत समिती लांजातर्फे माचाळ येथे येथे वृक्षरोपण

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : ग्रामसेवक संघटना शाखा लांजा व पंचायत समिती लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळ या पर्यटन केंद्राच्या ठिकाणी शुक्रवारी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी पंचायत समिती लांजा गटविकास अधिकारी श्री.संतोष म्हेत्रे, विस्तार अधिकारी संजय लोखंडे, लोहार, कृषि विस्तार श्री. घाणेकर, कक्ष अधिकारी श्री. आंबेकर, कुरणे, पालू येथील सरपंच सौ. नामये, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष चेतन दाभोळकर उपाध्यक्ष प्रबोध कीर, सचिव विक्रांत साळवी तसेच लांजा तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते. माचाळचे गावकर श्री. पाटील, मांडवकर हे देखील या वेळी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment