पाच दिवसांच्या मुक्कामानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : भक्तांच्या घरी पाच दिवसांच्या मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी गौरी गणपतीचे अत्यंत उत्साही वातावरण विसर्जन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी सायंकाळी झाली. भक्तांच्या घरी पाच दिवस मुक्काम केल्यानंतर कोकणात अनेक ठिकाणी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांसह लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

तत्पूर्वी मंगळवारी गौराईंचे आगमन झाले होते तर बुधवारी गौरी पूजनानिमित्त महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्याचा कोकणात ठिकठिकाणी वाढदिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुलालाची उधळण करीत विसर्जन मिरवणूक काही करण्यात आल्या. ग्रामीण भागामध्ये गावातून वाहणाऱ्या नदीपात्रात गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हे देखील अवश्य वाचा ▶️ Good news!! Ganpati special trains from Khed railway station

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment