कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी धावणार नव्या रंगरूपात!

Team RatnagiriLive
1 Min Read

नागरकोईल गांधीधाम एक्सप्रेसला जोडणारा २६ नोव्हेंबरपासून एलएचबी रेक

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी नव्या एलएचबी कोचसह धावताना दिसणार आहे. रेल्वेने जुने पारंपरिक डबे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक श्रेणीतील एल एच बी रेक गाड्यांना जोडण्यात येत आहेत. त्यानुसार हा बदल केला जात आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेस (16336/1635) या गाडीला नागरकोइल येथून सुटताना दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजीच्या फेरीपासून तर (16335 ) गांधीधाम येथून नागरकोईलसाठी धावताना दिनांक 29 नोव्हेंबर 2024 च्या फेरीपासून या गाडीला एलएचबी श्रेणीतील डबे जोडले जातील.

याआधी ही गाडी २३ डब्यांची होती. एलजी श्रेणीतील डब्यांमध्ये आसन क्षमता आधीच्या तुलनेत वाढत असल्याने आता ही गाडी 23 ऐवजी 22 एल एच बी डब्यांची धावणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment