बुडणाऱ्या नौकेतील १६ पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत फरीदचा आज सत्कार

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : रनपार समुद्रात आपल्याच इथले सोळा तरुण फिरण्यासाठी बोटीतून प्रवास करीत होती, दुर्दैवाने बोट समुद्रात बुडू लागली आणि या 16 तरुणांना मृत्यू समोर दिसत होता, अशा प्रसंगी देवासारखा एक दूत फरीद तांडेल याच्या लक्षात ही भयंकर घटना आली आणि त्याने जीवाची पर्वा न करता त्या बुडणा-या सोळा तरुणांना सुखरूप पणे किनाऱ्यावर आणले.
जात, धर्म याचा विचार करणा-या दुष्ट प्रवृत्ती ला ही चपराक आहे.फरीद ने या तरुणांना जात धर्म नाही विचारले फक्त आपले बांधव संकटात आहेत याचाच विचार केला आणि त्यांना जीवदान दिले अशा या फरीदच्या कार्यामुळे माणुसकी हीच एक जात आहे हे अधोरेखित झाले.
हा संदेश संपूर्ण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपले ऐक्य अबाधित राहिले पाहिजे….तर मग अशा अवलिया चा सन्मान करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आज शुक्रवार दि 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजता सुहेल मुकादम यांच्या जयस्तंभ रत्नागिरी येथील कार्यालयात या अवलियाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment