महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने उत्साहात साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मान्यवरांच्या हस्ते ‘सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन

उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा ५८ वा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सुखकर्ता’ हा छोटेखानी विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील हजारो मान्यवर महेंद्रशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

यावेळी नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, दिबांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, उद्योजक राम म्हात्रे, उद्योजक सुनील म्हसकर, डॉ. दीपाली गोडघाटे, ॲड. रेखा चिरनेरकर, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे, तसेच एम. जी. ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांचा सपत्निक सत्कार केला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment