रत्नागिरीच्या तरुणाची सुमारे साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगव्दारे जास्त नफा मिळवून देतो, असा बहाणा करुन येथील एका तरुणाची तब्बल साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक झल्याचे उघाडकीस आले आहे. ही घटना शनिवार 14 जून ते मंगळवार 17 जून 2025 या कालावधीत शहरातील धनजी नाका येथे घडली आहे.

जी. श्री. किशना असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात माझ एजाज सुभेदार (28, रा. आंबेडकर रोड, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादीचा टेलिग्राम ऍपवरुन संशयिताशी संपर्क होता. संशयिताने फिर्यादीला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीने सुरुवातील गुंतवणूक केलेली रक्कम परत करत संशयिताने त्याचा विश्वास संपादन केला. त्या नंतर फिर्यादीने आपल्या बँक खात्यातून संशयिताच्या बँक खात्यात व युपीआय आयडीव्दारे प्रथम 1 लाख 75 हजार रुपये व नंतर मित्र अजमल साजीद सोलकर याच्या बँक खात्यातून 3 लाख 58 हजार असे एकूण 5 लाख 33 हजार रुपये जमा केले.

दरम्यान, संशयिताने फिर्यादीला नफा तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment