रत्नागिरीत नवीन मासेमारी बोटीसह चारचाकी जळून खाक

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथे समुद्रकिनारी रविवारी नवीन मासेमारी नौकेला अचानक आग लागून बोटीसह बाजूलाच उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मच्छीमार बोटीसह आगीत जळून खाक झालेली बोलेरो जीप.

राजीवडा येथे समुद्रकिनारी उभ्या असलेल्या मच्छीमार नौकेला अचानक आग लागल्याचे लक्षात येताचं तेथील नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या काही क्षणातच मच्छीमार बोटीच्या फायबरने भेट घेतल्याने घटनास्थळी आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळाले.

या मासेमारी नौकेच्या बाजूलाच उभ्या असलेल्या बोलेरो जीपला देखील या आगीची झळ बसली. मच्छीमार बोटीसह या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment