रत्नागिरी जि. प. पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी-पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढावा या उद्देशाने दरवर्षी होणारे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे दोन दिवसीय ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी येथे झाले. दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  उपस्थित राहून, विजेत्यांना पारितोषिक प्रदान करुन, त्यांचे अभिनंदन केले.


या सोहळ्याला व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव, जिल्हापरिषद सदस्य विलास चाळके, महेश उर्फ बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, गुहागर सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment