रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १९ एप्रिल, २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर महाराज हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि ‘लिंगायत चळवळी’चे संस्थापक होते. समाजासाठी भगवान बसव यांचे प्रमुख योगदान म्हणजे जातिव्यवस्थेविरुद्ध केलेली समाजसुधारणा, महिला सक्षमीकरण, ‘अनुभव मंटपा’ची स्थापना आणि ‘लिंगायत संप्रदाया’ची उभारणी.
त्यांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून, ती समाजपरिवर्तनाची शपथ घेण्याची संधी आहे. त्यांच्या समतेच्या, श्रमसंस्कृतीच्या आणि मानवतेच्या विचारांचा स्वीकार केल्यासच आपण एक सुसंस्कृत, न्याय्य आणि प्रगत समाज घडवू शकतो.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
![]()
