- ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले रेल्वेमंत्र्यांना पत्र
ठाणे: मुंबई, संपूर्ण कोकण आणि गोव्याला जोडणारी अत्यंत लोकप्रिय प्रीमियम ट्रेन २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मान्सून काळात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असल्याने, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या मार्गावर तातडीने अतिरिक्त रेक (Additional Rake) मंजूर करण्याची मागणी केली आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे आणि मागण्या:
- फक्त ८ कोचची संरचना: वर्षभर १००% पेक्षा जास्त बुकिंग असूनही ही प्रीमियम ट्रेन सध्या केवळ ८ कोचसह धावत आहे, ज्यामुळे जागांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
- मान्सून वेळापत्रकाचा फटका: जून २०२३ मध्ये सुरू झालेल्या या ट्रेनला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, मान्सून वेळापत्रकामुळे (Monsoon Time Table) या गाडीचे फेरे कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे पर्यटक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
- कोकण रेल्वे मार्गावर ताण: कोकण रेल्वेचा रोहा-मडगाव खंड आधीच सुमारे १६८% क्षमता उपयोगावर (Capacity Utilisation) चालत आहे. अत्यंत व्यस्त मार्ग असल्याने फेरे कमी होताच जागांची भारी किल्लत निर्माण झाली आहे.
- ६ दिवस सेवा अखंडित ठेवण्याची मागणी: मान्सूनच्या पूर्ण कालावधीत मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची आठवड्यातून ६ दिवसांची सेवा अखंडित सुरू ठेवावी आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त रेक (Additional Rake) तैनात करावा, अशी आग्रही मागणी म्हस्के यांनी केली आहे.
