मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर; रत्नागिरी जिल्ह्यात महेंद्र खांबल प्रथम

Team RatnagiriLive
2 Min Read

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि.१६ (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी येथील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट चा मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. मानवी हक्क शिक्षणक्रम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त असा अभ्याक्रम मानला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यातून मानवी हक्क अभ्यासक्रमासाठी एकूण २९ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.

या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून श्री. महेंद्र शंकर खांबल (७९.३३%) हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तर व्दितीय क्रमांक सौ. संपदा नितीन किर (७७%) आणि सौ. मैथिली संदेश लांजेकर (७६.६७%) या तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. अभ्यासक्रमातील सर्वच विद्यार्थी फर्स्ट क्लास गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश कदम यांनी अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीचे प्रवेश प्रक्रिया सुरु
पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन उपयुक्त अभयसक्रमांचे नवीन बॅचसाठीचे प्रवेश प्रक्रिया १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक १ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विनाविलंब शुल्क सुरु राहणार आहे.
पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.


या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी ई-मेल – rckycmou7380a@gmail.com संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment