कुडाळमध्ये उद्या कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव !

Team RatnagiriLive
1 Min Read

कुडाळ : रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवार दि.८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे.

या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार. या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, मानसी नाईक, विनोदी अभिनेता भाऊ कदम, अभिनेता देवदत्त नागे, बॉलीवूड अभिनेत्री रीवा अरोरा त्याचप्रमाणे बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो सुद्धा यामध्ये रंगणार असून यामध्ये लेझर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment