रत्नागिरीत २९ सप्टेंबरला ईद ए मिलादनिमित्त रॅलीचे आयोजन

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी ईद ए मिलादचे औचित्य साधून जुलूस (रॅली)चे आयोजन करण्यात आले आहे.

मद्रसा फैजाने अत्तार कोकणनगर येथून ठीक सकाळी ८.३० वाजता जुलूस निघणार आहे. या रॅलीचा मार्ग कोकणनगर, किर्तीनगर, मारूती मंदीर, उद्यमनगर ते फैजाने अत्तार येथे शेवट होईल. या रॅलीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment