रत्नागिरी जिल्हयात २७ मे ते १० जून दरम्यान मनाई आदेश

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दि. 27 मे ते 10 जून 24 वा. कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.


एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिप्पणी करणे, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे/ आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवून, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
निवडणूक मतमोजणी शांततेत व व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र न बाळगणे व बरोबर घेवून न फिरणे यांस मनाई करण्यात आली आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment