जागतिक अनेक बड्या उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जवळपास दीड लाख कोटींचे सामंजस्य करार
दावोस : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात येऊ घातलेले काही महत्वाचे प्रकल्प
• अमेरिकेच्या न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशनतर्फे चंद्रपूर येथे २० हजार कोटींचा कोल गसिफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार)
• ब्रिटनच्या वरद फेरो अलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यात चार्मोशी येथे १२५० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार)
• इस्रालयच्या राजूरी स्टील अँड अलाईजचा चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे ६०० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार)
• पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट चा पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे ४०० कोटींचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार दोनहजार)
• गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा २० हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार ३० हजार)
• रुखी फूडसचा २५० कोटींचा पुणे जिल्ह्यात ग्रीनफील्ड अन्नप्रक्रिया प्रकल्प
• ग्रीन्को रिन्यूएबल एनर्जीचा औरंगाबाद येथे १२ हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार ६३००)
• जपानच्या निप्रो कॉर्पोरेशनचा पुणे जिल्ह्यात १६५० कोटींचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प (रोजगार २०००)
• इंडस कॅपिटल चा मुंबईत १६ हजार कोटींचा प्रकल्प
• मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणाबाबत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठासमवेत सामंजस्य करार
• पुणे जिल्ह्यात सुपा औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणा संदर्भात जपान बँकेसमवेत वाटाघाटी