दापोलीत भारतरत्नांच्या थीम पार्कसाठी हालचाली

दापोलीचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या २ ड्रीम प्रोजेक्टसाठी मिहीर महाजन यांनी घेतली ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट
दापोली : दापोली तालुका सांस्कृतिकदृष्टया अत्यंत समृद्ध असा तालुका आहे. तालुक्यातून महर्षी कर्वे, पां. वा. काणे असे भारतरत्न विजेते या शिवाय लोकमान्य टिळक, साने गुरूजी, व्रँगलर परांजपे अशी अनेक नररत्न घडली आहेत. तसेच शेजारील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव. या नररत्नांचा सन्मान ठेवत एक ‘भारत रत्नांचे थीम पार्क’ दापोलीत उभारले जावे, अशी मागणी मिहीर महाजन यांनी आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनात केली आहे.
विशेष महत्वाची बाब म्हणजे या भेटीदरम्यान हर्णे येथील ऐतिहासीक सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या विकासाबाबत देखील चर्चा झाली. गोवा फोर्ट – सुवर्णदुर्ग रोप वे उभारण्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार उमाताई खापरे यांनी सुधीर भाऊना विनंती केली असता त्वरित मा. मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी याना संबंधित शिफारस करणारे पत्र तयार करून पुढे पाठवले आहे.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तरुणांनी आपापल्या भागाच्या विकासासाठी असेच प्रयत्नशील राहण्याचे आवश्यक असल्याचे नमूद केले.