ब्रेकिंग न्यूज

हातखंबा येथे साखर वाहून नेणारा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटनेत क्लीनर गंभीर जखमी

रत्नागिरी दि. ३० : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतार व वळणावर आज (सोमवारी) सकाळी ७. ४५ वाजण्याच्या सुमारास साखर घेऊन येणारा ट्रक उलटला. या अपघातात चालक जागीच ठार झाला असून क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. 

या संदर्भातील अधिक माहितीनुसार – केए २३ ए ६६९४ हा ट्रक कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखर घेऊन चालला होता. हातखंबा येथील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो बाजूच्या मोकळ्या जागेत पूर्ण उलटा झाला. त्यामध्ये ट्रक चालक फारुख इसाक जमादार  (३८) हे जागीच ठार झाले तर क्लिनर कमरान कलादगी ( २४)  जखमी आहे. दोघेही बागलकोट, कर्नाटक येथील आहेत. ट्रक उलटला येथे याचवेळी येथे दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला.

जखमीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने  तत्काळ रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळतातच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पटील व श्री.घोसाळे, श्री. सावंत, श्री. उतेकर, घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व वाहतूक पूर्ववत केली.

अपघातग्रस्त ट्रक पूर्ण उलटला असून त्यातील साखरेची पोती मातीत पडली आहेत. अपघात घडताच स्थनिक लोकांनी मोठी गर्दी केली.  त्यांनी जखमींना बाहेर काढण्यास व रुग्णवाहिकेत ठेवण्यास मदत केली.

महामार्गावर हातखंबा येथे वारंवार असे ट्रकचे अपघात होत असतात. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी साखरेने भरलेले दोन ट्रक उलटले होते. त्यानंतर  त्यांनी पेट घेतला होता. त्यातही येथे साखरेने भरल्या ट्रकचे वारंवार अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button