आ. महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पगारवाढ
उरण दि. 25 (विठ्ठल ममताबादे ) : जेएनपीटी मरीन डिपार्टमेंट मध्ये 10 ते 15 वर्षापासून स्पेअर मरिन क्रू मध्ये 13 कामगार काम करत आहेत. जे टेंडर कॉपी मध्ये त्यांची नावे नाहीत आणि त्यांना फक्त किमान वेतन मिळत होते. या स्पेअर कामगारांना इतर कामगारांप्रमाणे कोणतेही फायदे सवलती मिळत नव्हते. ही बाब गेली कित्येक वर्षे बऱ्याच लोकप्रिनिधींच्या निदर्शनास आणली गेली पण काही फायदा झाला नाहीं पण ही बाब जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या लक्षात येताच ही बाब विजय भोईर यांनी उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी यांच्या कानावर टाकली. लगेचच आ.महेशजी बालदी यांनी जे.एन. पी.टी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला. आमदारांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून सदर कामगारांना इतर कामगांराप्रमाणे सर्व सवलती व भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आले आहे . तसेच 2019 पासून त्यांना वाढीव पगारातील फरक सुद्धा मिळणार आहे.
विजय भोईर यांच्या सारख्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नांमुळे सदर कामगारांना कुठे 15 ते 17 हजार वरून थेट 30 ते 35 हजार पगारात वाढ झाली व त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. सदर कामगारांचे नविन टेंडर मध्ये नाव घेण्यात येणार आहे.आणि इतर कामगार प्रमाणे वेज सेटलमेंट अँग्रीमेंट मध्ये देखील नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. या सर्व मागण्या जेएनपीटी प्रशासनाने मान्य केल्या आहेत. कामगारांना न्याय मिळाल्याने कामगारांनी आ.महेशजी बालदी व त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते जि. प. सदस्य विजय भोईर, उदयोजक विकास भोईर यांचे आभार मानले आहेत.कामगारांना सर्व सेवा सुविधा फायदे मिळाल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.