उद्योग जगत
ठाणे येथे कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषदेचा शुभारंभ
ठाणे : कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये पार पडले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांच्या हस्ते यावेळी कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कुणबी विद्यार्थी वसतिगृहासाठी शासनाकडून ७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
यावेळी संस्थापक अशोक वालम, अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे, माजी आ. अशोक विशे तसेच कुणबी समाजबांधव उपस्थित होते.