उद्योग जगत
महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यात स्वित्झर्लंडच्या उद्योगांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
डाव्होस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वित्झर्लंड मधील दावोसमध्ये विविध उद्योगांबरोबर ₹ ४२५२० कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.
आतापर्यंत सुमारे ₹ ८८४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरू असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांनी सांगितले.