रत्नागिरी विमानतळावर पुढील काही दिवसात नाईट लँडिंगची सुविधा : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरीत ई व्हेईकल कारखाना उभारण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी : रत्नागिरीच्या विकासाला चालना देणारा ई व्हेईकल कारखाना लवकरच सुरू केला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील प्रस्तावित जागा सर्वेक्षणासाठी संबंधित उद्योजक रत्नागिरीत दाखल देखील झाले आहेत. या उद्योजकांना सोबत घेऊन प्रशासनाकडून जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसात नाईट लँडिंगची सुविधा निर्माण केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील बेरोजगार हातांना काम घेण्यासाठी, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा ई वेईकल कारखाना लवकरच सुरू केला जाणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातल ई व्हेईकल कारखाना उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्या दृष्टीने हा प्रकल्प उभारण्याला गती आली असून संबंधित कारखान्याची टीम रत्नागिरी तालुक्यात जागा निश्चित करण्यासाठी दाखल देखील झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यासाठीची जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी दिली.