आगरी कोळी कराडी भाषेतील पहिली शॉर्टफिल्म ‘पिंकी’ प्रदर्शित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पिंकी हा पहिलाच आगरी कोळी कराडी चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सध्या प्रत्येक गावात लग्न समारंभ असतानाही तब्बल ३५० प्रेक्षक वर्ग या पाहिल्या प्रयोगात उपस्थित होते.
या लघूचित्रपटाचे लेखन हे रायगड भुषण किशोर पाटील यांनी केले असुन या चित्रपटाचे दिग्दर्शक समाज भुषण पुरस्कार व युवा गौरव पुरस्कार सन्मानित अमन कैलास वास्कर यांनी केले असुन या चित्रपटाचे निर्माते प्रसिद्ध कलाकार सोपान तुकाराम खाडे , सोमनाथ काशिनाथ म्हात्रे तसेच कैलास दयाराम वास्कर हे असुन या लघू चित्रपटाचे छायाचित्रकरण पनवेल मधिल कलुंद्रे गावातील प्रीतम रमेश नारकर यांनी केले आहे. आगरी कोळी कराडी भाषेतील हा पहिलाच लघु चित्रपट असून हा चित्रपट अविस्मरणीय राहील. सर्वांचे मनोरंजन करणारा व राजकारणी लोकांना समाज प्रबोधन करणारा हा चित्रपट असून या चित्रपटामधे मुख्य भूमिका अमन कैलास वास्कर व प्रियांका जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
सदर लघुपटामधे अँजल म्हात्रे, समर्थ घरत, सोपान तुकाराम खाडे , प्रीती गायकर, रोनक गायकर , नवनीत माळी , वैशाली मोहिते , तुषार पाटील, संदीप पडवळ, दिपेश पाटील, राज तोरणे, सोमनाथ म्हात्रे, चेतन पाटील, कृष्णकांत म्हात्रे, कुलदीप माळी, भरत मालुसरे, रोशन घरत, भाग्यश्री घरत, अरुण पाटील, अमित पाटील, मुकेश म्हात्रे, व इतर कलाकारांनी आपली कला सादर करुन सर्व प्रेक्षकांना आपल्या कलेतून मंत्र मुग्ध केले आहे.