साहित्य-कला-संस्कृती

चिपळुणात ५ फेब्रुवारीपासून रंगणार लोककलांचा जागर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या लोककला महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होणार आहे.

कोकणातील लोप लावत चाललेल्या सर्व प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती आणि पर्यटन संस्कृतीचा जागर दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या अनुभवायला मिळणार आहे.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा लोककला आणि खाद्य संस्कृतीचा समावेश देखील या लोककला महोत्सवात असणार आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत लोककला महोत्सवाचे स्वागाध्यक्षपद तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे हे जबाबदारी सांभाळणार आहेत

पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाला होणार सुरवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button