साहित्य-कला-संस्कृती

जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

संगमेश्वर : जेएसडब्ल्यू फाउंडेशन व रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्प्रर्धेला संपुर्ण जिल्ह्यातुन सर्व स्तरावरुन भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जयगड येथे जिंदाल कंपनीच्या प्रशस्त हॉलमध्ये रविवार १५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे .

या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातुन साधारणपणे ३५८४ चित्र व १६० हस्तकलेच्या वस्तु आमचआकडे प्राप्त झाल्या. यातुन उत्कृष्ठ चित्र व हस्तकलेच्या वस्तुंची निवड करण्यात आली.  जिल्हा कलाध्यापक संघ तसेच जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातुन स्पर्धेचे परिक्षण जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या ओ.पी. जिदल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथे करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरीतील विशेष शाळा ‘अविष्कार ‘ श्री शामराव भिडे कार्यशाळा रत्नागिरी येथिल विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत व हस्तकला स्पर्धेत सहभागी झाले होते. कुणाल देवेंद्र तोडणकर ह्या विशेष विद्यार्थ्याचा चितकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला व खुल्या गटात हस्तकला स्पर्धेतही महेंद्र चंद्रकांत बाणे या विद्यार्थ्याच्या कलाकृतीला विशेष कलाकृती म्हणुन निवड करण्यात आली आहे.

स्प्रर्धेचा निकाल पुढिलप्रमाणे :
गट अ – मोहम्मद फवाद फैजूल सारंग इक्रा इंग्लिश मिडियम स्कूल प्रथम , आभा ॠशिकेश भातवडे जी.जी.पी.एस.रत्नागिरी व्दितीय , अब्दुल रहमान गुलजार खान खदिजा इंग्लिश मिडियम स्कुल गोवळकोट तृतीय , शौर्य तुकाराम पाटील एस.पी.एम इंग्लिश मिडियम स्कूल परशुराम उत्तेजनार्थ
चैतन्य योगेश्स तिवरेकर , श्री लक्षीकेशव माध्यमिक  विद्यालय कसोप फणसोप उत्तेजनार्थ
सिया सुनील शृंगारे , एस.पी.एम इंग्लिश मिडियम स्कूल परशुराम उत्तेजनार्थ , प्रथम वामन पवार पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी , विशेष कलाकृती
गिरीजा विश्वेश भिडे , फाटक हायस्कूल रत्नागिरी विशेष कलाकृती , आर्यां चंद्रकांत धनावडे तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी , विशेष कलाकृती , ओंकार सखाराम रामाणे दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवणे ( संगमेश्वर) विशेष कलाकृती

गट ब – नवीद रिजवान कारीगर महराष्ट्र उर्दु हायस्कूल कडवई प्रथम , अथर्व हरिश्चंद्र नांदिंवडेकर गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे व्दितीय ,
विद्या गणेश सागवेकर कै. बा. हातीसकर  माध्यमिक विद्यालय टेंबे तृतीय , राधा निलेश गांधी एस.पी.एम इंग्लिश मिडियम स्कूल परशुराम , उत्तेजनार्थ
सानिका राम सामरे , तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी उत्तेजनार्थ , क्षितीज रुपेश नांदिवडेकर प्राचार्य नरेंद्र वि. मं. भू. उत्तेजनार्थ ,
खन्सा कालिमुद्दिन हमदुले खदिजा इंग्लिश मिडियम स्कुल गोवळकोट विशेष कलाकृती ,
गार्गी शरद मयेकर सेक्रेड हार्ट कॉनव्हेंट स्कूल रत्नागिरी विशेष कलाकृती , आलिया मन्सूरखान गवाणकर प्र. भि. चव्हाण जानशी राजापूर विशेष कलाकृती ,
श्रेया संदीप कदम मराठा मंदीर न्यू इंग्लिश स्कूल पाली विशेष कलाकृती

गट क – साक्षी मधुकर गवंडी आठल्ये सप्रे- पित्रे महाविद्यालय देवरुख प्रथम , वैष्णवी रविंद्र पवार न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वहाळ व्दितीय ,
उत्कर्ष शशिकांत कोतवडेकर मुरारी तथा बाई मयेकर जुनिअर कॉलेज मालगुंड तृतीय , शिवाजी वैभव साळवी वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर्डे – आंबतखोल उत्तेजनार्थ , तनू जगदीश राजभर न्यू इंग्लिश ्ज्यूनिअर कॉलेज खेर्डी, चिंचघरी-सती उत्तेजनार्थ , भूमीका वासुदेव घाणेकर उत्तेजनार्थ

गट ड –  अथर्व दिनेश सावंत जाकीमी-या सोसायटी रत्नागिरी प्रथम , जयंत गोपाळ फडके जांभुळआड पुर्णगड रत्नागिरी व्दितीय , किशोर गुरव नांदीवडे कुणबीवाडी, जयगड तृतीय , संतोष विश्वनाथ साळवी ईश्वरी कॉप्लेक्स आठवडा बाजार रत्नागिरी उत्तेजनार्थ , रविंद्र ना. मालप श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर उत्तेजनार्थ , दशरथ बापू जाधव मु.पो. वाटद खंडाळा उत्तेजनार्थ , महेंद्र चंद्रकांत बाणे अविष्कार श्री. शामराव भिडे कार्यशाळा रत्नागिरी विशेष कलाकृती , केतन आपकारे मु.पो.पानवल आपकारेवाडी ता.जि.रत्नागिरी विशेष कलाकृती ,
सोहा साकिब मुकादम अजिजा दाऊद नाईक स्कूल रत्नागिरी विशेष कलाकृती , जहुर अ. मजगावकर जयगड साखरमोहल्ला विशेष कलाकृती

रविवार १५ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
पेद्दाना , प्लॅन्ट हेड जे.एस.डब्ल्यू फौंडेशन , नरेंद्र गावंड
प्र. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)  जिल्हा परिषद रत्नागिरी , अनिल दधिच. सी. एस. आर. हेड जे.एस. डब्ल्यू फौंडेशन हे उपस्थित रहाणार आहेत . बक्षिस पात्र स्पर्धकांना  कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी रत्नागिरी येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे बस सकाळी साडेनऊ वाजता स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर नाट्यगृह इथून सुटेल यासाठी पुढील  मोबाईलवर नंबर  संपर्क करावा. संपदा धोपट ९५५२५७७०५२  सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे जेएसडब्ल्यू फाउंडेशन व रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या माध्यमातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

या स्पर्धेचे परिक्षण रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे पदाधिकारी अध्यक्ष इम्तियाज शेख, सचिव राजन आयरे, स्पर्धा प्रमुख  सुशील कुंभार, सल्लागार श्री. दरवजकर सर, सदस्य  प्रथमेश विचारे , निवृत्त कलाशिक्षक  मणियार जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने  संकेत नागवेकर, युगंधरा तळेकर,  किशोर गुरव यांनी केले. सर्व कला शिक्षक  तसेच कलाध्यापक संघाचे पदाधिकारी यांचे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतिने आभार मानण्यात आले आहेत .

स्पर्धेसाठी आलेल्या विशेष हस्तकलाकृती

स्पर्धा चित्रांचे परीक्षण करताना कलाशिक्षक आणि मान्यवर

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button