देवरुखमध्ये ७ ते ९ जावेवारीपर्यंत अभिरूचीचा स्वरोत्सव
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूखातील अभिरूची संस्थेतर्फे दरवर्षी अभिजात संगीत, नाट्य व नृत्य यांनी सजलेला महोत्सव संगीत प्रेमींसाठी स्वरोत्सव ओयोजित केला जातो.
यंदा हा स्वरोत्सव ७ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधित आयोजित करणेत आला आहे.
स्वरोत्सवात ७ जानेवारी रोजी पातियाळ घराण्याचे सुप्रसिद्ध गायक व पद्मश्री जगदिश प्रसाद यांचे शिष्य रमाकांत गायकवाड यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तर दि. ८ रोजी अभिषेक बोरकर यांची सरोन वादनाची मैफिल रंगणार आहे. दी. ९ रोजी राज्य संगित नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेले परस्पर सहाय्यक मंडळ. वाघांबे. था. गुहागर हे मंदारमाला हे संगित नाट्य सादर करणार आहेत.
हा स्वरोत्सव पित्रे प्रायोगिक कलामंच देवरूख येथे संपन्न होत असून या विनामूल्य असलेल्या स्वरोत्सवाचा आस्वाद संगित रसिकांनी घ्या असे आवाहन अभिरूची संस्थेतर्फे करण्यात आले आहे.