नाचणे येथे विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील नाचणे ही सलग चौथ्या वर्षी समर कॅम्प आयोजित करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची पहिली मराठी शाळा ठरली आहे. नाचणे ग्रामपंचायत व जि.प.पू.प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं. १ यांच्यावतीने समर कॅम्पचे आयोजन सलग चौथ्या वर्षी करण्यात आले आहे.

मनोरंजन, कला, आरोग्य व सुसंस्कारांसह विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ह्या दोन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी असून प्रवेश विनामूल्य आहे. दि. ३ व ४मे रोजी सकाळ सत्रात स. ७.३०.ते ११.३० या वेळेत समर कॅम्प होणार आहे.

शिबीरात मुंबई व रत्नागिरीतील नामवंत कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये सहभागीना झुंबा, योगा, जादूचे प्रयोग, ओरीगामी, क्राफ्ट, मनोरंजक खेळ, पक्षांचे आवाज, फेस पेंटिंग, आजी आजोबांच्या गोष्टी, बोला बिनधास्त, बालगीते ,बडबडगीतं, रेकॉर्ड डान्स बाबत डेमो व मार्गदर्शन केले जाणार आहे.

रत्नागिरी शहर व परिसरातील मुलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक ,सदस्य शुभम सावंत, शरदिनी मुळ्ये, दीपक नागवेकर यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment