साहित्य-कला-संस्कृती

मानाचे दांडेकर मानचिन्ह
शुभम गोविलकरने पटकावले

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक युवा महोत्सव

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विविध कलागुणांचा संगम असलेला ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सव उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणातसुरु आहे. या महोत्सवातील अभिनय स्पर्धेचे अत्यंत मानाचे समजले जाणारे आणि ५६ वर्षांची परंपरा असलेले ‘दांडेकर मानचिन्ह’ यावर्षी कलाशाखा पदव्युत्तर विभागाच्या शुभम गोविलकर याने पटकावले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नाट्य आणि अभिनयाचा एक समृद्ध आणि अविरत असा वारसा लाभला आहे. साहित्य, संगीत आणि नृत्य अशा कलांबरोबरच अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक कलावंत महाविद्यालयाने आजपर्यंत घडवले आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट अभिनय स्पर्धेकरिता दिले जाणारे मानाचे असे ‘दांडेकर मानचिन्ह’ हे ‘झेप-२०२२’ सांस्कृतिक युवामहोत्सवातील प्रमुख आकर्षण असते. या अभिनय स्पर्धेत एकपात्री आणि द्विपात्री अशा बहुरंगी नाट्यछटा असलेलेउपासक आपापलाकलाविष्कारसादर करतात. यंदाचा दांडेकर मानचिन्हाचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागून राहिलेली असते.

या स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ‘राज्य नाट्य स्पर्धे’त पाच वेळा अंतिम फेरीत प्रवेश केलेले ओंकार पाटील आणि स्मितल चव्हाण यांच्या हस्ते झाले. यास्पर्धेत व्यास गावन, मेहक मुजावर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय पारितोषिक प्राप्त केले. द्विपात्री अभिनय स्पर्धेत शुभम आंब्रे वशुभम बंडबे यांनी प्रथम, भक्ती शिंदे वगिरीजा चितळे यांनी द्वितीय तर सुजल मयेकर वसानिया गोंधळेकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्किटमध्येप्रथम वर्ष वाणिज्य शाखेची‘पाल चिकटली आहे’, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची‘अच्छी’, राष्ट्रीय सेवा योजना विभागाची ‘नॉट मी बट यू’यास्किटने अनुक्रमे प्रथम, द्वितीयआणितृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण परीक्षक ओंकार पाटील आणि स्मितल चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर झेप सांस्कृतिक युवामहोत्सव समन्वयक डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन आणि व्यवस्थापन बीएमएस विभागातील विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचा आस्वाद महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी यश सुर्वे विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून घेतला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button