सर्व खवैयांना मोहात पाडणारी
श्रध्दाची श्रावण थाळी..!
संगमेश्वर ( श्रीकृष्ण खातू ): महिनाभर शाकाहारी राहायचे म्हणजे तयारी हवीच ना! वर्षभर कधीही ताटात न पडणाऱ्या भाज्या यानिमित्ताने मुद्दाम आणायच्या व त्या करायच्या. श्रावणात सोमवार, नैवेद्यासाठी कोणते चार पाच करायचे, हे देखील महत्त्वाचे असते. त्यांच्या घरी वर्षातील ३६५ दिवस खारी खाल्ले जाते. त्यांना श्रावण म्हणजे विशेष काही वाटणार नाही. व हे स्वाभाविकच आहे.
पण ज्यांच्या घरी तिन्ही, त्रिकाळ मासे आणि मासेच असतात. त्यांना”श्रावण” म्हणजे शिक्षा वाटू लागते. घरातील महिलांनी बनवलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या शाकाहारी पदार्थांचे बळजबरीने कौतुक देखील करावे लागते. त्यांच्यासाठी मासळी पुढे शाकाहारी पदार्थ फिकेच वाटतात. पण तरीही
सगळ्याकडे काना डोळा करून महिला एका महिन्यासाठी स्वयंपाक घरातील चित्र बदलून टाकतात.
पण तरीही धावपळीच्या काळात ज्या महिला मंडळींना आपल्या घरी अशा सर्व पक्वान्नासह जेवण करणे शक्य होत नाही. ही एक आवड किंवा श्रावणातील अशा मंडळींची गरज म्हणून काही हॉटेल व्यावसायिक मालकानी आपल्या हॉटेलमध्ये पूर्ण श्रावण महिनाभर ऑर्डर प्रमाणे ” स्पेशल श्रावण थाळी ” म्हणून आपल्या सेवेत उपलब्ध करून देतात. कदाचित खवय्यांसाठी उपलब्ध करून दिलेली संधी , म्हणजे गिर्हाईकांच्या आवडीनिवडी साठी करून दिलेली ही एक उत्तम सोय म्हणावी लागेल. हॉटेल व्यावसायिक म्हणून धंद्यातील असणारी मालकांची चिकाटी ,कला , पदार्थातील विविधता, दर्जा, व गिऱ्हाईकांना तृप्त करून देण्यासाठी अशाच हेतूने ” हॉटेल श्रद्धा ” धामणी (ता. संगमेश्वर) येथे दरवर्षी श्रावण महिन्यात ” स्पेशल श्रावण थाळी” सुरू ठेवून कोकणची संस्कृती जपण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात.
हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेल्या पदार्थात मीठ, लोणचं, लिंबू फोड, सांडगी मिरची, अळूवडी, कोशिंबीर , पापड, फेणी, बटाटा वडा, पुरी, पुरणपोळी, उकडीचा मोदक, आमरस, उसळ, अळूवडी, , वरण , रानभाजी, उकड बटाटा भाजी, दही, सोलकढी क्रमाने अगदी नीटनेटकी पद्धतीने रेलचेल केलेली असते. पूर्ण भरलेली थाळी बघूनच समाधान होते.
एकदा या थाळीचा आस्वाद घेतला की, दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येकाला श्रद्धाची नक्कीच आठवण होते. काळाप्रमाणे बदल करावा. ऋतूनुसार पदार्थ उपलब्ध करून द्यावेत. व श्रावणासारख्या पवित्र महिन्यात सुद्धा अशा प्रकारचे स्पेशल थाली भोजन व्यवस्था करून देणे ही धंद्याच्या दृष्टीने महत्वाची कला मानावी लागेल.धंद्यासाठी तसेच ग्राहकाच्या आवड ,व समाधानाकरीता अशी वेगळी कल्पना व वेगळा विचार करून मागणी तसा पुरवठा
करण्याची नेहमी मालकांची तीव्र इच्छा दिसून येते.
हॉटेल श्रद्धाचे प्रभाकरशेठ घाणेकर, प्रवीणशेठ वाकणकर, त्यांचे चिरंजीव प्रथमेश व प्रणव हे यासाठी चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी सदा प्रयत्नशील असतात. भोजन झाल्यावर हात धुण्यापूर्वी, ” अन्नदाता सुखी भव!” असे शब्द प्रत्येक जण तोंडामध्ये पुटपुटल्याशिवाय व धन्यवाद दिल्याशिवाय राहवत नाही.