सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये निसर्ग चित्र कार्यशाळा
आ. शेखर निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निसर्गचित्र कार्यशाळेचे आयोजन
संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नव- नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल, यासाठी प्रयत्नशील असते. या मधून कलाविद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मिळाव्यात हा या मागचा प्राथमिक उद्देश असतो. यासाठी चित्रकार शिल्पकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शैक्षणिक सहल, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे मध्ये चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शेखरजी निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निसर्गचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यातून आमदार शेखर निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वेगळ्या पद्धतीने देण्यात आल्या.
कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोकणातील महत्वाची ठिकाणे म्हणजेच उदा. मार्लेश्वर, गणपतीपुळे,कोकण समुद्रकिनारे, करणेश्वर, थिबा राजवाडा इ. ठिकाणाची निसर्गदृश्य आपल्या हस्तकौशल्याने कागदावर उमटवली. यामध्ये ८०हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. या सर्व चित्रांमधून ५ पारितोषिके देण्यात आली. अशा या या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून शेखर निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आर्ट कॉलेज तर्फे देण्यात आल्या .