लोकल न्यूज

अपयशाला न घाबरता नव्या जिद्दीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते : समर्थ क्षीरसागर

तालुका विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उदघाटन

संगमेश्वर : शालेय स्तरावर पाचवी सहावीत आपण विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता मात्र नंबर आला नाही. त्यावेळी मन निराश झाले होते. मात्र जिद्दीने सातवीत असताना परत भाग घेतला आणि शेतीसाठी फवारणी यंत्राचे मॉडेल तयार केले आणि काय आश्चर्य आमच्या मॉडेलचा नंबर येवून आम्हाला पारितोषिक मिळाले. अपयशाने खचून जायचे नसते तर , नव्या जिद्दीने उभे राहीले तर हमखास यश मिळते हा अनुभव आपण स्वतः बालपणी घेतला आहे. आपणही पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही आणि  नंबर आला नाही तर ,  निराश न होता नव्या जिद्दीने प्रयत्न करा आणि नवी स्वप्ने उराशी बाळगा, असे आवाहन संगमेश्वर तालुक्याचे परिविक्षाधिन तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी केले

जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती संगमेश्वर शिक्षण विभाग आणि श्री शिवाजी शिक्षण उत्तेजक मंडळ कोसुंब संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब ता . संगमेश्वर आयोजित ५० वे संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळाव्याचे उद्घाटन समर्थ क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष नामदेव जाधव ,  माजी पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, संचालक शैलेश जाधव संस्था उपाध्यक्ष मंगेश जाधव, संस्था सदस्य , विजय शिंदे ,बळीराम जाधव, सचिन यशवंतराव , संस्था सचिव प्रणीत जाधव, आबा जाधव, कमलाकर जाधव , विजय जाधव, अमृत जाधव, अविनाश जाधव, चंद्रकांत जाधव , प्रभाकर वडके, अजय पांचाळ, प्रकाश पांचाळ, गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत राऊत, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, विज्ञान मेळाव्याचे परिक्षक, विज्ञान मंडळ तालुक्याचे कौस्तुभ जोशी, तालुक्यातील केंद्र प्रमुख, विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, या प्रदर्शनाचा वैज्ञानिक खेळणी हा विषय आहे. आपण येथे मांडलेली मॉडेल समजून घेऊन त्याचा आनंद घ्या, मानवाचे जीवन सुखकार करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होता होता. मात्र, आता ड्रोनच्या माध्यमातून विज्ञानाचा युध्दाप्रसंगीउपयोग केला जातोय हे दुर्दैवी आहे. विज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी व्हावा हा संदेश आज आपण येथून घेऊन जावूया असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी केले. प्रश्नमंजुषा मध्ये तालुक्यातील ३२ शाळांनी भाग घेतला असून , इयत्ता सहावी ते आठवीची एकूण ३५ मॉडेल आणि नववी ते बारावीची एकूण ३७ मॉडेल या प्रदर्शनात मांडण्यात आली असून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची १३ मॉडेल तर प्रयोगशाळा परिचरांची ४ मॉडेल मांडण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी यावेळी दिली.

संस्थेचे पदाधिकारी अविनाश जाधव  संस्थेला मेळावा घेण्याची संधी दिली यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागासाठी धन्यवाद यातूनच भावी विज्ञान शिक्षक , शास्त्रज्ञ घडत असतात . विद्यार्थी शिक्षकांची या मेळाव्यात मोठी मेहनत असते. प्रगतीसाठी विज्ञानाची मोठी गरज आहे असे जाधव यांनी नमूद केले. यावेळी प्रवीण लिंगायत यांनी लिहीलेल्या स्पर्धा परीक्षा तंत्र आणि मंत्र विषय गणित या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सावंत यांनी तर आभार प्रदर्शन देवीदास कुळ्ये यांनी केले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button