कलाध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिंदल फाउंडेशन आयोजित चित्रकला व हस्तकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात बबन तिवडे (कोकण विभागीय सचिव) इम्तियाज शेख (अध्यक्ष) स्वरुपकुमार केळसकर (उपाध्यक्ष) राजन आयरे (सचिव) तुकाराम पाटील (खजिनदार) सुशीलकुमार कुंभार व श्री उदय मांडे (स्पर्धाप्रमुख) जितेंद्र पराडकर (प्रसिद्धीप्रमुख) मुग्धा पाध्ये (महिला संघटक) श्री तुकाराम दरवजकर व बीद्रीकोटी मठ सर (सल्लागार) तसेच सदस्य गजानन पांचाळ, मोहन बुरुटे राकेश देवरुखकर रामचंद्र धुमाळे रियाज म्हैसाळेे प्रथमेश विचारे या रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाच्या नुतन कार्यकारणीचा माननीय उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी कौतुक करुन असेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन संघटनेला केले .