तांबेडी येथे भैरीभवानी मातेचा ५ मार्च रोजी त्रैवार्षिक गोंधळ सोहळा
देवरूख : समस्त भालेकर भावकीचे कुलदैवत आदिशक्ती भैरीभवानी मातेचा त्रैवार्षिक पांजीचा गोंधळ सोहळा रविवार, दि. ५ मार्च २०२३ रोजी तांबेडी गवळवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
आपण ज्या कुळामंध्ये जन्म घेतला त्या कुळातील कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटूंब सहपरिवार, मित्रपरिवारसहित उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्तभावकीच्यावतीने संदिप भालेकरयांनी केले आहे.
गोंधळ सोहळ्याची सुरूवात सकाळी ११ वा. करून दुपारी भैरी भवानी मातेचे पुजन. भैरी भवानी मातेचा जोगवा, पतिर भरणे, देवीची महाज्योत प्रदक्षिणा कार्यक्रम,झालेवर रात्रौ नवस बोलेणे व नवस फेडणे, महाप्रसादानंतर गोंधळास सुरवात होणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होणार असलेल्यांसाठी संगमेश्वर डेपोतून सकाळी ८.०५ दुपारी १२.५५ सायंकाळी ४.४५ या वेळात एसटी बसची सुविधा करण्यात आलेली आहे..