दिव्यांग प्रकल्पासाठी साहित्य वाटप
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कासारकोळवणचे माजी सरपंच सचिन मांगले यांचा उपक्रम
देवरूख (सुरेश सप्रे) : बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यकर्ते व संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण गावचे माजी सरपंच सचिन मांगले यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवस औचित्य साधत ‘ नेक्स जनरेशन फौंडेशन इंडीया संस्थेच्या दिव्यांगाकरिता राबवत असलेल्या साहस प्रकल्पात साहित्य वाटप केले.
बाळासाहेबांची शिवसेना’ या शीर्षकाची सन २०२३ या नूतन सालची त्यांनी दिनदर्शीका उपलब्ध केली आहे.
माजी सरपंच सचिन मांगले यांनी कोरोना महामारीमध्ये गावातील गोरगरीबांना शिधावाटप केले होते. तसेच ग्रामस्थांना मास्क, सँनिटायझर वाटप केले तर दिवाळीमध्ये उटणे वाटप केले होते. अशा प्रकारे समाजपयोगी उपक्रम त्यांनी राबवले होते. सरपंचपदाच्या कार्यकाळातही आपण अनेकांना मदतीचा हात दिला होता.
या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, रुपेश माने, प्रसाद सावंत, योगेश शिंदे, नेक्स जनरेशनचे संस्थापक सदानंद भागवत. साहस प्रकल्पाच्या ऍड. पुनम चव्हाण-जाधव आदी उपस्थित होते.