आठवडा बाजारात ग्राहकांच्या रोकड सुविधेसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेची एटीएम सेवा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांच्या रोकड सुविधेसाठी रत्नागिरीतील आठवडा बाजाराच्या ठिकाणी मोबाईल एटीएमची सुविधा देऊन ग्राहकांची गैरसोय दूर केली आहे.
इतर मोठ्या बँकांच्या बरोबरीने पावले टाकताना काळाची गरज ओळखून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निश्चित ठिकाणी असलेल्या एटीएम सुविधा केंद्रांशिवाय ग्राहकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी मोबाईल एटीएम सेवा यापूर्वीच सुरू केली आहे. रत्नागिरी शहरात आयटीआय समोरील मैदानात दर मंगळवारी तर बाजारपेठेत आठवडा बाजार रोडलगत भरणाऱ्या बाजाराच्या ठिकाणी ग्राहकांना बँकिंग सेवा देताना रोकड कमी पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.
जिल्हा बँकेने या दोन्ही ठिकाणी मोबाईल एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना एटीएम कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा पुरवली आहे. यामुळे बाजारात आयत्यावेळी रोकड कमी पडल्यास त्यासाठी होणारी ग्राहकांची गैरसाई टळली आहे