करजुवे येथील महिलेच्या खुनाचा पोलिसांकडून उलगडा
संशयित आरोपीला ठोकल्या बेड्या
संगमेश्वर : तारवाशेत पिरंदवणे, संगमेश्वर येथील जंगलमय पायवाटेवरून विविध वाड्या व गावांमध्ये किरकोळ मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारी एक वर्षीय महिला सईदा रिझवान सय्यद (रा .हनुमान नगर, मधलीवाडी, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी) हिला एका अज्ञात इसमाने मारहाण व तिच्या डोक्याला गंभीर इजा करून तिला ठार मारून तिचे प्रेत जंगलामध्ये काही अंतरावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नेऊन टाकले होते.
मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा खून होताच संगमेश्वर व परिसरामध्ये तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत होती. या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्या प्रमाणे अपर पोलीस अधीक्षक , श्रीमती जयश्री गायकवाड तसेच विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक झावरे , संगमेश्वर पोलीस ठाणे,पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी स.पो. फौ. संजय कांबळे, पो. हे. कॉ. विजय आंबेकर , पो. हे. कॉ. सागर साळवी, पो. ना. दत्ता कांबळे
तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस संतोष झापडेकर सचिन कामेरकर पोलीस उपनिरीक्षक देशमुख पिरदवणे पोलीस पाटील भांबडे, पोलीस कांबळे, खोंदल, आव्हाड किशोर जोयशी, बरगाळे स्थानिक गु. शा. रत्नागिरी व संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. काही दिवसांच्या आतच म्हणजे दि.२० फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे पिरंदवणे बोद्धवाडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय युवकास जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी जयेश रमेश गमरे याने किरकोळ मासे व्यावसायिक श्रीमती सईदा रिझवान सय्यद रा हनुमान नगर, मधलीवाडी ब्वा संगमेश्वर हिची दगडाने ठेचून हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून त्यास दि. २१ फेब्रुवारी रोजी ४.३१ वा अटक केली असून त्या २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .