महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी धावणार स्पेशल फेअर ट्रेन!

रत्नागिरी :  उधना-मडगाव ही कोकण मार्गे धावणारी स्पेशल फेअर गाडी दि. 11 ऑगस्ट रोजी धावणार आहे. ही गाडी विशेष तिकीट दरासह चालवण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 09018 उधना-मडगाव जंक्शन विशेष गाडी दि. 11 ऑगस्ट 2023, शुक्रवार रोजी उधना येथून 15.25 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक 09017 मडगाव जंक्शन-उधना स्पेशल गाडी मडगाव जंक्शन येथून 12/08/2023, शनिवार रोजी 10.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 05.00 वाजता उधना येथे पोहोचेल.

उधना-मडगाव स्पेशल फेअर गाडीचे थांबे


नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

वरील गाडी क्रमांक 09017 मडगाव जंक्शन – उधना स्पेशलचे आरक्षण 10/08/2023 रोजी आणि गाडी क्रमांक 09019 मडगाव जंक्शन – उधना स्पेशल स्पेशल आणि 09411 कुडाळ – अहमदाबाद जंक्शन विशेष गाडीचे आरक्षण 12/08/2023 रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button